Friday, November 14, 2025

National

एसटी बस आणि दुचाकी मध्ये अपघात, एकाचा मृत्यू,चिपळुण तिवरे रस्त्यांवरील घटना

चिपळूण (प्रतिनिधी):  चिपळूण-तिवरे रस्त्यावरील रिक्टोली फाटा येथे एका अवघड वळणावर बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास तिवरे येथून चिपळूण कडे जाणारी तिवरे-पुणे एसटी बस आणि कडे येणारी दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये जयवंत बाबाजी शिंदे  यांचा मृत्यू तर गणेश पांडुरंग शिंदे ( दोघेही राहणार तिवरे) हे  गंभीर  जखमी झाले आहेत. 

 मिळालेल्या माहितीनुसार, तिवरे पुणे-बस रिक्टोली फाट्या नजीक असलेल्या एका अवघड वळणावर आली असताना समोरून येणारी दुचाकी एस टी बस वर धडकली. त्यामध्ये जयवंत बाबाजी शिंदे  व गणेश पांडुरंग शिंदे ( दोघेही राहणार तिवरे) हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. दरम्यान जयवंत बाबाजी शिंदे यांचा मृत्यू झाला. ऐन नवरात्र उत्सवात शिंदे कुटुंबीयांवर दुःखाची कळा पसरल्याने दसपटी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 पुढील तपास अलोरे पोलीस स्टेशनचे भरत पाटील करत आहेत.

spot_img

International

RELATED ARTICLES