नवी मुंबई – विविध विमाने टेक-ऑफ आणि लँडिंग करतात, पण भारताला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली प्रगती आणि विकास घेऊन आले आहे. नवी मुंबई हे केवळ विमानतळ नाही, तर नवीन भारतावरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून फक्त विमानांचे उड्डाण होणार नाही, तर एक मजबूत आणि आत्मनिर्भर भारत उभारला जाणार आहे. 21 व्या शतकात मोदीजींनी देशाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा देशात केवळ 74 विमानतळ होते. गेल्या दहा वर्षांत ही संख्या दुप्पट होऊन 150 वर पोहोचली असून 2030 पर्यंत ती 220 करण्याचा संकल्प प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
देशातील सर्वात लांब भुयारी मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा देखील त्यांनी दाखवला होता. उत्तर आणि पश्चिम मुंबईला दक्षिण मुंबईशी भुयारी मार्गाने जोडणारी ही मेट्रो पायाभूत सुविधांचा उत्तम नमुना आहे. पुढील दोन-चार वर्षांत सर्व मेट्रो लाइन सुरू होतील आणि मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त एका तासात पोहोचता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्यामुळे देशातील प्रमुख पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत. राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने तब्बल 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’ हा दिलेला शब्द पाळला असल्याचे श्री.शिंदे यांनी नमूद केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने पीएम किसान सन्माननिधी योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 33,565 कोटी रुपये दिलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

