ठाणे (सचिन ठिक) जर शाळांना नामफलक नसेल तर ती शाळा अनधिकृत आहे अशी गणली जाते, मात्र ठाणे महानगरपालिकेची शीळ येथील प्राथमिक शाळा क्रं.८१/२६ ही अधिकृत असूनही या शाळेला नामफलक देण्यास ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे याच शाळेत गटप्रमुख आणि समन्वयक एकाच शाळेत उपशिक्षक असूनही शाळेच्या इमारतीला नाव नसल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली.
शीळगाव येथे ठाणे महानगरपालिकेची प्राथमिक शाळा क्र.८१/२६ आहे.या शाळेच्या दर्शनी भागात शाळा कोणती आहे,त्या शाळेचे नाव काय आहे? हे समजण्यासाठी मराठी नामफलक अनिवार्य आहे?.मात्र या शाळेकडे पाहीले असता ही शाळा नेमकी कोणती आहे? असा संभ्रम पालक वर्गाला पडत आहे.शाळेला अजून ना का दिले नाही?.शाळा अनधिकृत तर नाही ना ? असे अनेक प्रश्न पालगवर्गातून विचारले जात आहेत.एकीकडे अनधिकृत शाळा सूसाट चालू असताना ठाणे महानगरपालिका आपल्याच विभागातील शाळांचे नियम पाळताना दिसत नसल्याचे समोर येत आहे.
दोन गटप्रमुख एकाच शाळेत गटप्रमुख पदी
शीळगाव येथे ठाणे महानगरपालिकेची प्राथमिक शाळा क्रं.८१/२६ ही सुरु आहे त्या शाळेतच उपशिक्षक म्हणून सर्व शिक्षा अभियान समन्वयक श्री गिरीश शेलार,गटप्रमुख श्री उमाकांत कूडे (गट क्र.७) आदी शिक्षकवृंद्य आहेत.मात्र जबाबदार व्यक्ती असताना या शाळांचे नामफलक अजून का लिहले गेले नाही असा सवाल पालकवर्गातून केला जात आहे.दरम्यान याबद्दल पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत असून शिक्षण विभागाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

