Monday, May 20, 2024
40.6 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeकारोबारफ्लॅशमॉबद्वारे तरुणांनी केली मतदान करण्याबद्दल जागृती ठाणे महापालिकेचा मतदार जागृती उपक्रम

फ्लॅशमॉबद्वारे तरुणांनी केली मतदान करण्याबद्दल जागृती ठाणे महापालिकेचा मतदार जागृती उपक्रम

ठाणे – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी रविवारी सायंकाळी विवियाना मॉल येथे पीडीसी इव्हेंट्स या ग्रुपने फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबद्दल आवाहन केले. 

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मतदार जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याच मालिकेत, रविवारी सायंकाळी नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या विवियाना मॉलमध्ये मतदार जागृती करण्याची जबाबदारी युवावर्गाने घेतली होती. आम्ही मतदान करणार आहोत, आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन या युवांनी नागरिकांना केले. तसेच, फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली. लवकरच असा फ्लॅशमॉब कोरम मॉल येथेही करण्यात येणार आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular