Monday, May 20, 2024
40.6 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeक्राइमहोळी आणि धुळीवंदनासाठी मुंब्रा पोलिसांचा चोख बंदोबस्त,केमिकलयुक्त फुगे मारल्यास होणार कारवाई

होळी आणि धुळीवंदनासाठी मुंब्रा पोलिसांचा चोख बंदोबस्त,केमिकलयुक्त फुगे मारल्यास होणार कारवाई

दिव्यासाठी २५ पोलिस कर्मचारी ठेवणार नजर

ठाणे शहर – ठाणे पोलिस आयुक्तलयाच्या विद्यमाने मोठा फौजफाटा पाच परिमंडळात तैनात करण्यात आला आहे.केमिकलयुक्त फुगे मारण्याचे प्रकार घडल्यास कायदेशिर कारवाईचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत.या पार्श्वभुमीवर मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री अनिल शिंदे यांनी विविध गस्ती पथक,साध्या वेश्यातील पोलिस कर्मचारी नेमुन विशेष खबरदारी घेतली आहे.मुंब्रा पोलिस अंतर्गत बीट क्र.४ मध्ये दिवा विभागात सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री शहाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली २५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

होळी आणि धुळीवंदनासाठी ठाणे आणि आयुक्तालयाच्या ५ परिमंडळात २ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर धुळीवंदनाच्या दिवशी ठाणे वाहतुक विभागाने ७०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत.रविवारी होळी आणि सोमवारी धुळीवंदन असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कुठलाही अनुचित प्रकार घडून नये,यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विद्यमाने मोठा फौजफाटा पाच परिमंडळात तैनात करण्यात आला आहे.त्यातच केमिकलयुक्त फुगे मारण्याचे प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.या यासाठी पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे.पाचही परिमंडळात नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतुक पोलिस ब्रेथ एनालाईझर मशीनद्वारे तपासनी करणार आहेत.या वाहतुक पोलिसांच्या कारवाईसाठी जवळपास ६२ पोलिस अधिकारी आणि ६५० पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.

दिव्यातील महत्वाच्या ठिकाणी बीट क्रमांक ४ च्यावतीने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहेत.संभाव्य होणारे अनुचित प्रकार लक्षात घेता आगासन,दिवा चौक,दातिवली,दिवा स्टेशन परिसर,या भागात साध्या गणवेशातील पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोणीही अनुचित प्रकार घडवून आणल्यास सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिवा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री शहाजी शेळके यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular