Monday, May 20, 2024
35.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeज़रा हटकेमेट्रो आता मिळेल पटकन,लागणार नाही रांगेसाठी वेळ,तिकीटांऐवजी नवीन प्रणाली

मेट्रो आता मिळेल पटकन,लागणार नाही रांगेसाठी वेळ,तिकीटांऐवजी नवीन प्रणाली

मुंबई – कधी मोबाईलचे नेटवर्क न मिळणे, कार्ड स्पंच होत नाही तर कधी क्युआर कोड स्कँन होत नाही या प्रवाशांच्या दररोजच्या त्रासामुळे मेट्रो प्रवाश्यांची  भली मोठी लागणारी रांग आता कमी होणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने नवीन प्रकारच्या तिकीट प्रणालीचे उद्घाटन केले आहे.

मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरुन प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीटाची गरज पडणार नाही. तसेच मोबाईलवरुन क्यूआर कोड स्कॅनची गरज देखील पडणार नाही. कारण मुंबई मेट्रो 1 ने नवीन तिकीट पर्याय म्हणून टॅपटॅप रिस्टबॅंड सादर केला. ज्यामुळे प्रवाशांना विनाअडथळा प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल.  टॅपटॅप रिस्टबॅंड स्कॅन करुन मेट्रो प्रवास शक्य होणार आहे.

मेट्रो 1 चा हा बँड पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवला आहे. ऍलर्जी नसलेले आणि त्वचेला त्रास न देणारा हा बॅंड असणार आहे. मेट्रोने हा बँड 200 रुपयांच्या ऑफर किंमतीत सादर केला आहे. एएफसी गेटला फक्त बँडवर टॅप करावे लागेल.  मुंबई मेट्रो वनच्या सर्व ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावर हा बॅंड उपलब्ध आहे. हे उत्पादन मुंबई मेट्रोच्या बिलबॉक्स प्युरिस्ट टेक सोल्युशन्सच्या सहकार्याने विकसित केले आहे. सध्या वापरात असलेल्या प्रवासी स्टोअर व्हॅल्यू पासनुसार त्यांचे टॅपटॅप रिस्टबँड खरेदी आणि रिचार्ज करू शकतात. MMOPL अधिकाऱ्यांनी पारंपारिक पेमेंट पद्धतींच्या तुलनेत कमी झालेल्या कार्बन फूटप्रिंटवर जोर देऊन TapTap चे पर्यावरणीय फायदे हायलाइट केले. रिस्टबँड बॅटरीशिवाय चालतो, जलरोधक आणि टिकाऊ आहे.  तसेच या बॅंडचा पावसाळ्यातही वापर केला जाईल.  हा बॅंड धुवू देखील शकतो.. MMOPL बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीच्या सहकार्याने मनगटावरील बॅण्डची संकल्पना पुढे आणून प्रत्यक्षात उतरवली आहे. सिलिकॉन वापरून हा बँड वापरून तयार केलेले वापरण्यास अतिशय सोपे आहेत. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमओपीएलला आहे.  मुंबई मेट्रो वनने टॅपटॅपच्या सादरीकरणासोबतच परतीच्या प्रवासाची तिकिटे, मासिक अमर्यादित प्रवास पास आणि व्हॉट्सॲप ई-तिकीटिंग समाविष्ट करण्यासाठी तिकीट पर्यायांचा विस्तार केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular