Monday, May 20, 2024
35.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeज़रा हटकेसिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहरच्या वतीने  संस्थेचा प्रथम वर्धापन दिन...

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहरच्या वतीने  संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

दिवा – सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहर, च्या वतीने  संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कोकणातील दशावतार कार्यक्रमाने तर अनेक जणांची मने जिंकली.

1मे महाराष्ट्र दिन , कामगार दिवस असल्यामुळे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली , शहरातील नागरिकांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले , दुपारी सत्यनारायणाची महापूजा, महिलांसाठी हळदीकुंकू , कला ,  क्रीडा क्षेत्रातील नामांकिताचा सत्कार , जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार , सुमधुर भजन असे अनेक उपक्रम नागरिकांनसाठी आयोजित करण्यात आले होते , रात्री  दशावतारातील प्रसिद्ध असलेल प्रकाश लब्धे प्रस्तुत पाप-पुण्य दशावतार नाट्यप्रयोगचे आयोजन करण्यात आले , दिवा शहरातील हजारो नाट्य रसिकांनी या दशावतार प्रयोगाचा लाभ घेतला.

 सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक , तथा भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू दादा परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली , यांच्या बरोबर  ठाणे , दिवा , डोंबिवली मधील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली व संस्थेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 महिलांसाठी खास आकर्षण म्हणून लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या पाच महिलांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. 

सदर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी संस्थेचे सरचिटणीस श्री.समीर नारायण चव्हाण, यांचा संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.नितीन कोरगावकर , सल्लागार श्री.गोविंद घाडीगावकर ,उपाध्यक्ष श्री.रवी मुनंनकर, खजिनदार श्री.संदेश सावंत , आणि संपूर्ण टीम यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला , सदर प्रसंगी  कार्याध्यक्ष श्री.नितीन कोरगावकर , अध्यक्ष श्री.गणेश नेवगे , सरचिटणीस श्री .समीर चव्हाण , उपाध्यक्ष श्री.रवी मुनंनकर , श्री.सुरेश जाधव, खजिनदार श्री.संदेश सावंत,  श्री.विनोद घाडी , श्री.चंद्रकांत लाड , सल्लागार श्री.गोविंद घाडीगावकर , श्री.लहू गुराव, श्री अनंत पडेलकर, श्री.किरण कोरगावकर ,श्री.विठ्ठल गावडे , श्री.सचिन गोसावी, श्री.उदय तोरस्कर श्री.विवेक परब , विनायक पांचाळ , विघ्नेश सुर्वे , श्री.नंदकिशोर धुरी , श्री.प्रसाद धुरी , वसंत हरी घाडीगावकर , श्री.प्रकाश घाडीगावकर , श्री रुपेश दुखंडे  आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या उत्साहात सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करू , असे आश्वासन संस्थेचे सरचिटणीस समीर चव्हाण व कार्यध्यक्ष नितीन कोरगावकर यांनी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular