Monday, May 20, 2024
35.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeमनोरंजन'यापुढे ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही'खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त...

‘यापुढे ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही’खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

ठाणे –  ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘मूकबधीर बालक मुक्त ठाणे’ या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचे स्क्रिनिंग केले जाईल. त्यामुळे कर्ण दोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचे तत्काळ निदान होईल. तसेच, त्यावर जलद उपचार होतील. त्यामुळे लवकरच ठाण्यात एकही बालक मुकबधीर राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या  ‘मूकबधीर बालक मुक्त ठाणे’ या योजनेचे उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचे प्रकाशन शनिवारी सकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले.

महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार अॅड. निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, प्रख्यात ईएनटी तज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल, डॉ. आशिष भूमकर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे उपस्थित होते. त्याचबरोबर, माजी नगरसेवक, महापालिकेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुले, त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने, बालकांच्या स्क्रिनिंगसाठी लागणारी चार उपकरणे (ओऐई) महापालिकेच्या चार प्रसूतीगृहांना वितरित करण्यात आली.
         

‘मूकबधीर बालक मुक्त ठाणे’ योजनेची तयारी गेले काही महिने सुरू होती. त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवरही बरीच चर्चा झाली. त्यातून ही योजना आकाराला आली आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानात हा उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि डॉ. प्रदीप उप्पल, डॉ. आशिष भूमकर यांनी खूप मेहनत घेतली असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

 तसेच, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ठाणे बदलू लागले आहे. तसाच विकास आरोग्य क्षेत्राचाही होत आहे. बरेचदा ज्या गोष्टी दिसतात त्या करण्याकडे आमचा भर असतो. न दिसणाऱ्या मात्र आवश्यक असणाऱ्या गोष्टी तज्ज्ञ मंडळी लक्षात आणून देतात. त्यातूनही या अशा योजना आकार घेतात, असेही खासदार शिंदे म्हणाले. दोन्ही कानांसाठी कॉकलिअर इन्प्लांट देणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका आहे, असेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular