Monday, May 20, 2024
40.6 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeमोठी बातमीलांजा आंजणारीत शिंपले काढायला गेलेल्या दोघां भावांचा बुडून मृत्यु, घटनेने हळहळ

लांजा आंजणारीत शिंपले काढायला गेलेल्या दोघां भावांचा बुडून मृत्यु, घटनेने हळहळ

लांजा : लांजा तालुक्यातील आंजणारी काजळी नदीत शिंपले शोधण्यासाठी गेलेल्या आंजणारी शिंदेवाडीतील दोन सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 3 वाजून 45 मिनिटांनी घडली. प्रमोद नारायण शिंदे (25) आणि मनीष नारायण शिंदे (22) अशी या दुर्घटनाग्रस्त भावांची नावे आहेत

या दुर्घटनेतून या दोघा भावांची बहीण कल्याणी आणि मामा पांडुरंग शिंदे हे पाण्याततून वेळीच बाहेर आल्यामुळे  बचावले. या दुर्घटनेमुळे  आंजणारी गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस पाटील सौ. श्रद्धा सरपोतदार आणि ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कांबळे यांच्या प्रसंगवधनाने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत झाली. प्रमोद आणि मनिष याचे वडील याचं काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. आता दोन भाऊ गेल्याने कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.

काजळी नदीवरील धरणांचे पाणी सोडण्यात आल्याने काजळी नदीत या काळात मुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. मुळे काढण्यासाठी दुपारी प्रमोद आणि मनिष, बहीण कल्याणी आणि मामा पांडुरंग शिंदे यांनी बेत आखला. नादिवली स्मशानभूमी येथे काजळी नदीच्या डोहात मुळे काढण्यासाठी हे चौघे पाण्यात उतरले होत. मुळे मिळत होते मात्र प्रमोद आणि मनिष पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात पुढे जात असताना खोल डोहात बुडू लागले. यावेळी दोघे ही भाऊ एकमेकांना सावरण्यासाठी प्रयत्न करू लागले परुंतु खोल पाण्यात ते बुडाले  बहीण आणि मामा यांनी अर्धा तास झाला तरी दोघे बाहेर न आल्याने आरडाओरडा केली.

याबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कांबळे आणि पोलीस पाटील श्रद्धा सरपोतदार यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या दोघा भावांना बाहेर काढण्यासाठी पट्टीचे  पोहणारे याना पाचारण करण्यात आले. वेरळ गावचे वसंत गजबार ,आंजणारी गणपत शिखरे, दीपक पाष्टे ,यांनी बुडालेल्या दोन भाऊ यांना सायंकाळी सहा वाजता पाण्यातुन बाहेर काढण्यात यश आले. सरपंच प्रवीण शिखरे ही घटनास्थळी दाखल झाले. मात्र दुर्घटनाग्रस्त  दोन्ही  भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पुढील सोपस्कारंसाठी  दोन्ही मृतदेह हे लांजा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनास्थळी लांजा पोलीस निरीक्षक आणि पोलीस पथक दाखल झाले होते. या दुर्घटनेमुळे आंजणारी गाव हळहळ व्यक्त करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular