Monday, May 20, 2024
40.6 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeराजकीयशिवसेना (शिंदे गट) दिवा युवासेनेच्या अध्यक्षपदी श्री अमर ब्रम्हा पाटील यांची निवड

शिवसेना (शिंदे गट) दिवा युवासेनेच्या अध्यक्षपदी श्री अमर ब्रम्हा पाटील यांची निवड

दिवा (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना (शिंदे गट) यांच्यातर्फे विविध रिक्त पदांच्या नियुक्त्या करण्यात येत असून खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहराच्या युवा अध्यक्षपदी माजी नगरसेवक श्री अमर ब्रम्हा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना विभागल्यानंतर दिव्यातील हे पद रिक्त होते. ते भरुन काढीत माजी नगरसेवक श्री अमर पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. या निवडीमुळे दिव्यातील अनेक युवकांनी अभिनंदन केले आहे.

कल्याण लोकसभेच्या पार्श्वभुमीवर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिवसेना (शिंदे गट) गटप्रमुखांची संवाद बैठक नुकतील कल्याण येथील क्लासिक होटेल येथे पार पडली.या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अमर पाटील यांना नियुक्तीचे पत्र देवून जबाबदारी सोपविली.श्री अमर पाटील यांनी यापुर्वी युवासेनेचे विभाग अधिकारी म्हणून ६ वर्षे काम पाहीले आहे.ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक युवकांशी जवळीक साधलेली आहे.

गेली अनेक वर्षे नगरसेवक पद भुषवित असताना रस्ते,पाणी,युवकांसाठी रोजगार मेळावे भरणे,गरीब घटकांना शिक्षणासाठी मदत करणे,ठाणे जिल्हा स्तरावर युवकांसाठी विविध उपक्रम राबविणे,जनतेच्या समस्या सोडविणे अशी अनेक कामे त्यांनी पार पाडलेली आहे.भविष्यात पुढेही असेच दिव्यातील विभागानूसार उपक्रम राबवून दिव्यातील युवकांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे.

याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे,जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे,दिवा शहरप्रमुख श्री रमाकांत मढवी,कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी आणि दिवा येतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular