Monday, May 20, 2024
40.6 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeराजकीयदिव्यात मनसेच्या प्रयत्नामुळे साबेगावातील वाहनांना दिलासा

दिव्यात मनसेच्या प्रयत्नामुळे साबेगावातील वाहनांना दिलासा

रेल्वे फाटकातील वाहतुक कोंडीवर केली उपाययोजना

दिवा (प्रतिनिधी) दिवा फाटकात कायमस्वरुपी होणारी वाहतुक कोंडी आणि या वाहतुक कोंडीमुळे साबेगावातील वाहनांची होणारी अडवणुक लक्षात घेवून दिवा मनसेने दिवा प्रभाग समिती आणि ठाणे वाहतुक विभागाच्या मदतीने तलावाच्या बाजूने रस्ता मोकळा करुन नागरिकांना दिला दिला आहे.नागरिकांप्रती मनसेची असलेली ही तळमळ कौतुकास्पद बनत चालली आहे.

दिवा शहरातील वाहतूक कोंडीचे नियमन करण्यासंदर्भात दिवा मनसेकडून काल वाहतूक पोलीस आणि सहाय्यक आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. त्यानुसार आज वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कृष्णाजी खराडे आणि सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांच्या सोबत दिवा स्टेशन परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.

दिवा फाटकाजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकत्या जिन्याच्या बाजूने छोट्या वाहनांसाठी साबे गावात जायला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार काल रात्री त्या बाजूच्या रस्त्याचे डांबरीकरण करून घेऊन आज हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.

तसेच स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून द्यावा असे मनसेकडून सांगण्यात आले. मुंब्रादेवी कॉलनी रिक्षा स्टॅण्ड आणि स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँडला बॅरिकेडिंग करून प्रवाशांना रांगेत रिक्षा उपलब्ध करून देणे व वाहतूक कोंडी करणारे ,विनापरवाना गाड्या चालवणारे, स्क्रॅप च्या रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणारे, बॅच किंवा गणवेश न वापरणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी वाहतूक विभागाकडे करण्यात आली.

यावेळी दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, शरद पाटील विभाग सचिव परेश पाटील शाखाध्यक्ष सागर निकम, रिक्षा युनियनचे अध्यक्ष विनोद भगत हे पदाधिकारी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular