समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कारांनी गौरव
खेड :कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या मातृसंघटनेचा १०५ वा वर्धापन दिन व शिक्षण महर्षी तु. बा. कदम यांचा स्मृतिदिन नुकताच नवभारत हायस्कूल, भरणे (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड ग्रामीण संलग्न खेड युवा ग्रामीण व खेड महिला ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक वसंत दादा उदेग चिपळूण, खेड येथील प्रमुख उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत प्रमुख सुयश पाष्टे, चिपळूणचे समाज नेते दादा बैकर,उद्योजक चंद्रकांत परवडी, जि.प. माजी अध्यक्ष शंकर कांगणे, संस्थेचे सचिव तु. ल. डफळे, माजी उपसभापती रामचंद्र आईनकर, विजय जाधव, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा ,सचिव सचिन गोवळकर,खजिनदार सुधीर वैराग,युवा अध्यक्ष सुरज जोगळे, महिला अध्यक्ष ममता भुवड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यां व्यक्तींना समाज नेते , माजी आमदार शिक्षण महर्षी तु. बा. कदम यांच्या नावाने त्यांच्या पुण्यतिथी व वर्धापन दिनानिमित्त सन-2025 चे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सन 2025 चा समाज भूषण पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक क्षेत्रात काम केलेल्या प्रकाश जाधव भरणे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रमाणे विविध क्षेत्रातील कृषी- दत्ताराम शिंबे, वैद्यकीय- श्रेया चांदीवडे , उद्योग-उमेश नक्षे, शिक्षण- किशोर आदावडे, सांस्कृतिक-अमित दिवाळे, क्रीडा-स्वप्निल बैकर, विशेष पुरस्कार पत्रकारिता- बाळू सनगरे , विशेष पुरस्कार आध्यत्मिक- गणपत येसरे यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यावेळी शाखेचे सचिव सचिन गोवळकर यांनी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या मातृसंघटनेची 105 वर्षातील वाटचाल व संघटनेचे कार्य , तसेच समाजनेते, शिक्षण महर्षी स्व. तु. बा. कदम यांचे समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेले कार्य याबाबत प्रस्ताविकेत मांडणी केली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी यांनी आपल्या मातृसंघटनेचे केलेले कार्य व समाजनेते, माजी आमदार व शिक्षण महर्षी तु. बा. कदम साहेबांचं कार्य पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजे. आझाद मैदान आरक्षण बचावसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी खेड 15 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहावे.असे आवाहन केले.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना श्री उदेक म्हणाले की, कुणबी बांधवानी उद्योग क्षेत्रात काम करायला हवं. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या आपण मार्गदर्शन करु.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सहसचिव बाळू सनगरे यांनी केले.

