Monday, May 20, 2024
35.1 C
Delhi
Monday, May 20, 2024
spot_img
Homeराजकीयशिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची अतिविराट ऐतिहासिक सभा

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची अतिविराट ऐतिहासिक सभा

मुंबई – नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यंनी केला आहे.

शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या अतिविशाल सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करत होते ते पुढे म्हणाले की. मुंबई हे सर्वात शक्तीशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे, इथला विचार सर्व देशात पोहचतो. मोदींनी किती गॅरंटी दिल्या व त्या पूर्ण केल्या का? असा सवाल केला. आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल असा इशारा दिला. 

सभेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्ष एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहेत हे चुकीचे आहे. एका व्यक्तीला चेहरा बनवनू पुढे केले आहे. आम्ही या शक्तीच्या विरोधात लढत आहोत. नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा आहे. अभिनेत्याला जसे भूमिका दिल्या जातात तशाच भूमिका त्यांच्या कडून करून घेतल्या जातात, मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहे. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. ईडी, सीबीआय सारख्या हिंदुस्थानच्या प्रत्येक संस्थेत राजाचा आत्मा आहे. भिती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेले आहेत. देशातील मीडिया व सोशल मीडियासुद्धा सामन्यांच्या हातात नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिलांचे प्रश्न आहेत पण ते दाखवले जात नाहीत.

नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत. विरोधीपक्षाला ईव्हीएम दाखवावे, ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर VVPAT स्लीप डब्ब्यात पडते त्याचीही मोजणी करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली परंतु निवडणूक आयोग मोजणी करण्यास नकार देत आहे. मोदी फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, ईडी ऑफीसमध्ये अनेक तास बसवले पण घाबरलो नाही, मी कोणालाही घाबरत नाही. तसेच इंडिया आघाडीतील नेतेही घाबरत नाहीत. ही आघाडी हिंदुस्थानचे रक्षण करण्यास एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलोक्टोरोल बाँडमधून खंडणी वसुली केली जाते. महान व्यक्तींनी एकच संदेश दिला आहे आणि तो म्हणजे नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान उघडा,असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular