Monday, April 6, 2026

National

नवी मुंबईत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. सदर इसमाचा मृतदेह २८ मार्च २०२६ रोजी रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास मनपा रुग्णालय, वाशी येथे आणण्यात आला होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाचे वय अंदाजे ५५ वर्षे असून त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. इसमाचा रंग सावळा, नाक सरळ, चेहरा सडपातळ असून डोक्याचे केस काळे-पांढरे आहेत. अंगावर फिकट निळ्या रंगाचा चेक्सचा फुल शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट असा पोशाख होता.

या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कल्याणी पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सदर अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास एनआरआय सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून वारसांचा शोध सुरू आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES