दिवा (ठाणे) दिवा लोकलसाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील दिवा रेल्वे स्थानक पुर्व येथे सुरु असलेले २९ जुलै २०२५ रोजी मध्य रेल्वेचे अधिकारी,पोलिस प्रशासन यांच्या मध्यस्थीने तसेच अमोल धनराज केंद्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांचे बेमुदत धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.
दिवा जंक्शन ते CSMT लोकल सेवा सुरू करण्यासाठी कित्तेक वर्षा पासून निवेदने देणे,हजारो प्रवाशांनी स्वाक्षरी मोहीम घेणे,मोर्चा,ढोल बजाव आंदोलन करून ७ दिवस आमरण उपोषण करुन रेल्वे प्रशासनाकडून पुढच्या वर्षी पर्यंत लोकल चालू होईल असे सांगण्यात येत होते.मात्र लोकल चालू केली नाही.दरम्यान दिवा स्थानकात १९ फास्ट लोकल थांबवण्यात आल्या होता. सध्या त्या भरुन येत असल्यामुळे त्याच दिवेकर प्रवाशांना आता शिरताही येत नाही. मात्र दिवा ते CSMT लोकल चालू करण्याचा लढा पूर्ण झाला नसल्याने समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी १ जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. विशेष म्हणजे २७ जुलै रोजी आंदोलनाच्या २७ व्या दिवशी त्यांचा वाढदिवस असूनही त्यांनी तो जनहिताच्या लढ्याला वाहून दिला होता.
दरम्यान १ जुलै पासून सौ अश्विनी अमोल केंद्रे यांचे सुरू असलेलले बेमुदत धरणे आंदोलनाला काल २९ व्या दिवशी स्थगिती देण्यात आली. प्रशासनाच्या मतदीने न्यायालयीन लढा लढून मागण्यांची पूर्तता करून दिवा ते CSMT लोकल दिवा शहरातील जनतेसाठी सुरू करणार असल्याचे समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे व अमोल धनराज केंद्रे यांनी सांगितले.
