Thursday, February 12, 2026

National

बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे  : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणीपुरवठा करण्यासाठी अलीकडच्या काळात 116‍8‍मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी  कार्यान्वित करण्याकरिता  इंदिरानगर नाका येथे 750मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करणे आवश्यक आहे. परिणामी बुधवार दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार दिनांक 27/11/2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रुपादेवी जलकुंभ, रुपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत  परिसर आदी भागांचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद नागरिकांनी घ्यावी. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

spot_img

International

RELATED ARTICLES