Tuesday, March 31, 2026

National

आचार संहीता काळात सोशल मिडियावर प्रचार केल्यास होणार कारवाई, सोशल मिडिया प्रचाराची वेळ संपली

ठाणे – निवडणुकीसाठी गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धडाका अखेर थांबला आहे. ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोर लावला होता.

आता प्रत्यक्ष मतदानाची वेळ जवळ आली असून, प्रशासनाने आचारसंहितेबाबत कडक पावले उचलली आहेत. सोशल मीडियावरील प्रचारावर बंदी ची अधिकृत वेळ संपल्यानंतर आता उमेदवार मतदारांशी थेट भेटीगाठींवर भर देणार आहेत.

मात्र, फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून प्रचार केल्यास, तो आचारसंहितेचा भंग मानला जाईल. अशा प्रकरणांत उमेदवारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिला आहे.

प्रचार काळात झालेली गर्दी आणि नेत्यांनी दिलेली आश्वासने मतांमध्ये रूपांतरित होणार का, याचे उत्तर १६ जानेवारी रोजी मतदान यंत्रातून स्पष्ट होईल. तोपर्यंत उमेदवारांसाठी ‘सावध’ राहूनच पुढील पावले उचलावी लागणार आहेत.

spot_img

International

RELATED ARTICLES