Tuesday, March 31, 2026

National

दिवा हा सुसंस्कृतच..मतदानादरम्यान कुठेही गैरप्रकार नाही, दिवा पोलीसांकडून पृष्टी

ठाणे (सचिन ठिक) ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दिव्यात आज 5.30 मिनीटांनी मतदानाची वेळ संपली मात्र मतदान करताना तसेच प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारची मारामारी,अफरातफरी, गुन्हे,गैरप्रकारांची नोंद नसल्याचे दिवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री अमोल कोळेकर यांनी सांगितले आहे.दरम्यान दिव्यातून 50 ते 55 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

आज दिवसभरात पाहीलं तर सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत दिवा शहरात 20.55 टक्के मतदानाची नोंद झाली होती.तीच नंतर 1.30 वाजता 30 टक्यांनी वाढली होती.मात्र पोलीस सुत्रांनी दिलेल्या अंदाजानुसार सायंकाळपर्यंत 50 ते 55 टक्के मतदान हे दिवा शहरात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.दरम्यान याबाबत अधिकृत आकडेवारी लवकरच ठाणे महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात येणार आहे.

शिवसेना-भाजपा महायुती,उबाठा-मनसे आणि इतर पक्ष दिवा शहरात गेल्या 15 दिवसांपासून आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारात उतरले होते.मात्र प्रचारात करताना उमेदवार किंवा कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही मोठी बाचाबाची तसेच गुन्हे दाखल नसल्याची माहीती दिवा पोलीस स्टेशनमधून देण्यात आली.आहे.

साधारण एखादी निवडणुक निष्कलंक,निर्विवाद पार पाडावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून असते.यात दिवा शहर कुठेही मागे पडलेले नाही.निवडणुक जिंकण्यासाठी आपपापल्या पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.हा प्रचार करताना कुठेही गालबोट लागल्याची नोंद नसल्याचे निदर्शनास आले.या चांगल्या वृत्तीमुळे दिवा शहरातील नागरिकांनी सुसंस्कृत मानावे लागेल यात शंका नाही.

spot_img

International

RELATED ARTICLES