पाचल विभागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार अनेक पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेने पक्षामध्ये प्रवेश
लांजा ( संदेश कांबळे)
लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून ताम्हणे सौंदरकरवाडी व ताम्हाणे वरचीवाडीतील उबाटा गटातील शिवसैनिकांसह अनेक ग्रामस्थांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी पाचल विभागातील उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश करून खिंडार पाडले.
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हजारो ग्रामस्थांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पाचल विभागासह संपूर्ण मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रसंगी आमदार किरण सामंत म्हणाले, “माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्या प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पाचलसह संपूर्ण राजापूर तालुक्याचा विकास हा माझा ध्यास आहे. आपल्या सर्वांच्या सोबत काम करताना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही,” असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला.
या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप तालुकाप्रमुख दीपक नागले, ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पा साळवी ,सुनील गुरव ,आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर , उद्योजक बाबा शेठ भिंगार्डे, शैलेश साळवी अमर जाधव, आत्माराम सुतार, सरपंच समीक्षा वाफेलकर रवी सावंत, रमेश चव्हाण, अमित साळवी, मनीष लिंगायत, उदय राणे, संदीप बारसकर, भाई अडसूळ, शिवराम इस्कर तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



