कल्याण शहर – कल्याण पश्चिमेचा स्कायवॉक नेमका कुणासाठी? फेरीवाले, गर्दुल्ले अन् वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा वावर; जास्त दिसत आहे त्यामुळे नागरिक संतापले असून रस्ता काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रेल्वे स्थानकापासून अनेक लॉज संख्या मोठ्याने वाढल्याने वारांगना याचा राबता ही मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने महिलापुरुषाना उचंबना सहन करावी लागत आहे या कारणाने कल्याणाचा स्काय वॉक सध्या चर्चेचा विषय बनला आहे
कल्याण स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अड्डा. नागरिक हैराण झाले आहे. महापालिका अन् पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष, होत असल्याने सर्वांचे फावले आहे त्यामुळे नागरिकांचा आरोप करीत आहेत .
नागरीक त्रस्त
कल्याण स्थानक परिसरातील प्रसिद्ध स्कायवॉक प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पूर्व – पश्चिमला जोडणाऱ्या या पुलामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहेत. स्कायवॉकवर फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी आणि गर्दुल्ल्यांनी अड्डा मांडला आहे. यामुळे नागरिकांना रहदारी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य म्हणजे या पुलावर वेश्याव्यवसाय करणारे महिला देखील असतात. यामुळे काही महिला नागरिकांना असुरक्षितता वाटते. या स्कायवॉकवरून हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, अस्वच्छता, बेकायदेशीर व्यवसाय आणि असुरक्षित वातावरणामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. या संपूर्ण प्रकाराकडे महापालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या साटंलोट्यामुळे स्कायवॉक गोरखधंद्यांचा अड्डा बनला असल्याचा आरोपही कल्याणकरांनी केला आहे. प्रवाशी नागरिकांनी याचा विरोध केल्यानंतर त्यांना फेरीवाल्याच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहे. त्यामुळे प्रवाशी घाबरून यावर काही भाष्य करण्यास तयार होत नाहीत. मुख्य म्हणजे दिवसाढवळ्याही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलाही या स्कायवॉकवर दिसून येतात. यामुळे पुरुषांसह महिलांनाही असुरक्षित वाटते. प्रवाशांना पुलावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो. काहीना मोबाईलबचोराकडून मारहाण होताना दिसते . अनेक तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल आहेत . मारहाणी च्या अनेक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता या समस्येतून नागरिकांची सुटका कधी होणार? हा मोठा प्रश्न कल्याणकरांसमोर उभा राहिला आहे.

