लांजा दि.(प्रतिनिधी) सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी पूर्णता उध्वस्त झाला असून या शेतीचे शासनाच्या वतीने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोकणातील ठाणे, पालघर ,रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला यामुळे कोकणातील शेतीचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खरंतर भात कापणीच्या वेळेलाच हा मुसळधार पाऊस पडल्याने पूर्णता भात शेतीचे नुकसान झाले आहे यामुळे भात शेती कुजून गेल्याने कोकणातील शेतकऱ्यांना उपजीविकेचे अन्य कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर भविष्यात उपासमारी येऊ शकते तसेच पाळीव जनावरे यांच्या वैरणीचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे याची शासनाने दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून कोकणातील शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच आपत्तीग्रस्त म्हणून कोकणातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात यावा व शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील देण्यात यावी अशी विनंती कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री. म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या,कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी