डोंबिवली : नवरात्र उत्सव हा देवी आई दुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. श्त्रीशक्तीला हा उत्सव समर्पित केला गेल्याने वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे.
डोंबिवली पूर्वेकडील जय हनुमान मित्र मंडळ सागर्ली यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी देखील पारंपारिक पद्धतीने तुळजाभवानी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
पारंपारिक वाद्य, संबळाचा निनाद, महंत, पुजार्यांच्या मंत्रोच्चाराने, महा आरतीने तसेच आई राजा उदो-उदोच्या जयघोषाने सागर्ली परिसर भक्तीभावाने दुमदुमून गेले आहे.
नवरात्रीउत्सवाच्या निमित्ताने गरबा,देवीचे जागरण गोंधळ, पारंपारीक पद्धतीने पूजा परिपाठ, महिला भगिनींसाठी हळदीकुंकू, लहानमुलांसाठी वेशभूषा यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन उपरोक्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच परिसरातील हजारो भाविक देवी आईच्या दर्शनासाठी मोठया संख्येने जय हनुमान मित्र मंडळाला आवर्जून सदिच्छा भेट देत असतात.सातत्याने नऊ दिवस उपरोक्त मंडळाचे वरिष्ठ सल्लागार मार्गदर्शक सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सर्व महिला भगिनी कार्यक्रमासाठी प्रचंड अशी मेहनत घेत असतात.

