Friday, March 13, 2026

National

तंत्रज्ञानाचा उपयोग हा ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला पाहिजे – डी. डी. देसाई

तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे खावडी हायस्कुल येथे उदघाटन. तालुक्यातील एकूण ८८ प्रतिकृतीचा सहभाग.

लांजा दि.१० (प्रतिनिधी) शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना फक्त एक संधी मिळून देण्याची गरज असते आणि तीच गरज विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचे काम खावडी हायस्कुल व पंचायत समिती शिक्षण विभाग करत आहे. खरतर विज्ञान प्रदर्शनाचे प्रतिनिधित्व ग्रामीण भागातील विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे येथील भौगोलिक परिस्थिती पाहता येथे वन्य प्राण्यांकडून होणारे शेती नुकसान व त्यादृष्टीने शेती बचाव असे तंत्रज्ञान विकसीत होणे गरजेचे आहे हे आणि हे तंत्रज्ञान श्रीमंताच्या नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले पाहिजे असे प्रतिपादन सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. डी. देसाई यांनी लांजा तालुक्यातील खावडी येथे केले.

    लांजा तालुक्यातील श्री. सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा खावडी आणि पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे लांजा तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे मंगळवार दि. ९ डिसेंबर रोजी उदघाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी डी. डी. देसाई कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवसेना लांजा लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, सरपंच सौ. मृणाली आंब्रसकर, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, शाळा समिती अध्यक्ष आनंद देसाई, विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर, विस्तार अधिकारी विमल चव्हाण, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, जिल्हा सचिव महेश पाटकर, एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक संतोष कोलते, विज्ञान मंडळाचे सर्जेराव पाटील, केंद्रप्रमुख भिकाजी रावले, विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक ज्ञानेश्वर नाजरे, पोलिस पाटील महेश वीर, खावडी हायस्कुलच्या मुख्यध्यापिका सौ. दामिनी भिंगार्डे, केंद्र शाळा खावडीचे मुख्याध्यापक मनोहर म्हाड्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्धाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंतराळयानाच्या प्रतिकृतीचे उड्डाण करून तसेच फित कापून करण्यात आले. या बाल विज्ञान प्रदर्शनात लांजा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक अशा एकूण ८८ शाळांच्या प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या . यावेळी गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी बोलताना सांगितले की शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. नवे नवे प्रयोग अवगत करावेत जेणेकरून विज्ञानात गरुड झेप घेण्याची जिद्द बाळगावी. तर विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचारी अशा तीन विभागातील कर्मचारी आपली वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकृती मांडत असतात. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील जे बाल वैज्ञानिक आहेत त्याना आपल्या बुद्धीला, कल्पनाशक्तीला चालना मिळवून देण्याचे एक व्यासपीठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून मिळत आहे. यातूनच भविष्यातील देशाचे वैज्ञानिक घडतील असा आशावाद व्यक्त केला. शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, जिल्हा सचिव महेश पाटकर, परीक्षक ज्ञानेश्वर नाजरे यांनी मनोगत मांडली.
या कार्यक्रमात खावडी येथील ग्रामस्थ व माजी विद्यार्थी लांजेकर परीवार यांचा विशेष सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एन. बी. कदम यांनी केले. या उदघाटन सोहळ्याला लांजा तालुक्यातील संस्थाचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी विशेष मेहनत घेतली

spot_img

International

RELATED ARTICLES