देवदर्शन दरम्यान स्थानिक ग्रामस्थानी केले जोरदार स्वागत
लांजा (प्रतिनिधी )तालुक्यात सध्या नवरात्री उत्सवाची लगबग सुरू आहे या नवरात्रोत्सवातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी लांजा तालुक्यातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ तसेच ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण केल्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून गावागावातील ग्रामस्थ व मानकरी यांच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत व शिवसेना पदाधिकारी यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
तालुक्यातील अनेक नवरात्रोत्सव मंडळ व ग्रामदेवता यांचे दर्शन घेण्यासाठी आज शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी आज लांजा तालुक्याचा झांजावती दौरा केला व अनेक मंडळ व ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेचे गतवैभव प्राप्त होऊ दे असे साकडे घातले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, लांजा तालुका प्रमुख सुरेश करंबळे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उल्का विश्वासराव, खानवली विभाग उपविभागप्रमुख प्रदीप गार्डी, सहकार सेनेचे जिल्हासंघटक चंद्रकांत शिंदे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो- खानवली येथे नवलादेवी मंदिरात विनायक राऊत यांचे स्वागत करताना खानवली गावचे मानकरी दिसत असून सोबत जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुका प्रमुख सुरेश करंबळे आदी प्रमुख पदाधिकारी दिसत आहेत.

