Wednesday, February 11, 2026

National

दिव्यात उबाठा पदाधिका-यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

दिवा (सचिन ठिक) ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुक प्रक्रिया सुरु असतानाचा उबाठा गटातील आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी आज दिवा शीळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या पक्ष प्रवेशानंतर मात्र दिव्यातून भारतीय जनता पक्षात जाण्याचा ओघ सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

दिवा शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो.मात्र देशात आणि राज्यात भाजपा मोठ्या संख्येने जिंकत असल्याने या बालेकिल्ल्यालाही भाजपचे आवाहन दिसून येत आहे.राज्यात महायुती असली तरी आता महापालिकांच्या निवडणुकांत अनेक कार्यकर्ते एकाच पक्षात नाराज असल्याचे दिसून येत आहेत.त्या त्या पक्षात त्यांना मिळत नसलेला सन्मान यामुळे उबाठा गटातील उपविभागप्रमुख दिनेश यशवंत भोईर ,मनिष घाग,हरिश्चंद्र पालकर,रवी ठाकूर,चेतन सुतार,संतोष पडियार आदी महत्वाच्या कार्यकर्त्यांनी दिव्यातून कमळ हाती घेतल्याचे दिसून येत आहेत.

या पक्षप्रवेशामुळे दिव्यातील शिंदेसेनेला आणि उबाठा गटाला धक्का मानला जात आहे.दरम्यान सध्यातरी ठाणे महानगरपालिकेचे दिवा शहरातून महायुतीचे अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत त्यामुळे युती राहणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असा प्रश्न आहे.त्यातच माजी आमदार श्री सुभाष भोईर यांनी नुकताच प्रवेश केला आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांचे बळ वाढलेले आहे.कल्याण ग्रामीण भागातून भारतीय जनता पक्षातील वारंवारचे पक्ष प्रवेश पाहता स्वतंत्र लढण्याची जोरदार तयारी मात्र सुरु असल्याचे दिसून येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES