Wednesday, February 11, 2026

National

दुर्लक्षित दिवा तलावाचे तातडीने सुशोभीकरण व्हावे आणि तत्काळ निधी मंजूरीसाठी दिवा भाजप शिष्टमंडळाने महायुतीचे स्थानिक आमदार श्री.राजेश मोरे यांची घेतली भेट

दिवा (वार्ताहर) एकेकाळी दिवा शहराचा मानबिंदू असलेला दिवा स्टेशन परिसरातील तलाव, सध्या जवळ जवळ 17 ते 18 वर्ष झाली मृतअवस्थेत असून तलाव परिसरात भरणी करून त्याचे पात्र बुजवून अनधिकृत गाळे बांधण्यात आले आहेत, स्टेशन परिसरात बसणारे मच्छी विक्रेते , भाजी वाले त्यात घाणीचे पाणी व इतर कचरा टाकत आहे. त्यामुळे संपुर्ण तलाव कच-याने व्यापून गेला असून या दुर्लक्षित दिवा तलावाचे तातडीने सुशोभीकरण व्हावे आणि तत्काळ निधी मंजूरीसाठी दिवा भाजप शिष्टमंडळाने महायुतीचे स्थानिक आमदार श्री.राजेश मोरे यांची भेट घेतली.

पुर्वी संपूर्ण दिवा शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन या तलावात होत होते. स्थानिक रहिवाशांच्या इतर सर्व विधी तलावावर संपन्न होत होत्या , परंतु आजची स्थिती खूपच भयाण आहे , संपूर्ण तलाव आणि आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्टेशनवरून ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.या सर्व समस्या घेऊन स्थानिक आमदार श्री. राजेश मोरे साहेब यांची दिवा भाजप शिष्टमंडळाने भेट घेऊन तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच पुरेसा निधी उपलब्ध करण्यासाठी निवेदन दिले.या भेटीनंतर आमदार राजेश मोरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्ला आहेत.त्यामुळे लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा चे आगमन होणार आहे , गणेशोत्सवकाळात श्री.गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची मागणी देखील दिवा भाजप च्या वतीने करण्यात आली.आमदार साहेबांनी देखील सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर आपण निधीची उपलब्धता करू असे आश्वासन दिले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ अध्यक्ष श्री. सचिन भोईर , श्री. अशोक बाबुराव पाटील ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री गणेश पद्माकर भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री.रोशन भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , श्री.दिलीप भोईर माजी मंडळ अध्यक्ष , श्री समीर नारायण चव्हाण दिवा मंडळ सरचिटणीस , श्री.अंकुश मढवी , जयदीप भोईर व्यापारी सेल अध्यक्ष , श्रीधर पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष , अजय सिंग अशोक गुप्ता उ.भा.मोर्चा अध्यक्ष , आदी पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

International

RELATED ARTICLES