Tuesday, March 31, 2026

National

बेतवडे येथील रिक्षाचालक सूरज पाटील यांचा प्रामाणिकपणा,महीलेची हरविलेली बॅग परत केली

दिवा (प्रतिनिधी) माणूसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही टिकून आहे.याचा प्रत्यय दिव्यातील चिन्मय हाईट येथे राहणाऱ्या सौ.विद्या बालगुडे यांना नुकताच आला आहे.एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी रिक्षात विसरलेली महत्वाची कागदपत्रे आणि रोखरक्कम तसेच दागिणे असलेली बँग परत मिळाली आहे.

दिव्यात गणेश नगर परिसरातील चिन्हय हाईट येथे राहणाऱ्या सौ.विद्या विलास बालगुड़े या मुंबईवरुन कामावरुन येत असताना त्यांनी दिवा पुर्व येथून घरी जाण्यास रिक्षा पकडली होती.गणेश नगर येथे उतरल्यावर घाईघाईत असताना त्यांची रोखरक्कम आणि दागिणे असलेली बँग रिक्षातच राहीली.दरम्यान बेतवड्याला राहणारे रिक्षाचालक सूरज पाटील (गाव-बेतवडे ) यांना त्यांची बॅग रिक्षातच राहीली असल्याचे लक्षात आले.बँग कोणाची आहे हे समजण्यासाठी ती उघडल्यावर त्यांना आधारकार्ड सापडून आले.त्यांना आधारकार्डवर पत्ता असल्याचे निदर्शनास आले.त्या पत्त्याच्या आधारे रिक्षाचालक सूरज पाटील यांनी गणेश नगर येथील शिवसेना शाखाप्रमुख श्री राजेश पाटील तसेच जनार्दन गुरव यांच्याशी संपर्क साधला.लगेचच त्या महिलेला बँग परत मिळवून दिली.आपल्याला हरविलेली बॅग परत मिळाल्यामुळे सौ.विद्या बालगुडे यांना अश्रु अनावर आले.

बॅगत रोख रक्कम आणि महत्वाची कागपत्रे होती.जी परत काढण्यासाठी मोठा वेळ खर्च करावा लागला असता.मात्र बेतवडे गावातील रिक्षाचालक सूरज पाटील यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आजच्या जगात पहायला मिळत नाही.

spot_img

International

RELATED ARTICLES