Tuesday, March 31, 2026

National

माणुसकीची भिंत प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या वतीने लांजा तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

लांजा दि.११ ( प्रतिनिधी ) सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माणुसकीची भिंत प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. १६ जानेवारी ते रविवार दि.१८ जानेवारी या दरम्यान लांजा तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळातील होतकरू, हुशार व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिली.

 माणुसकीची भिंत प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्ष लांजा तालुक्यासह जिल्हाभरात विविध शैक्षणिक साहित्य तसेच समाजातील अपंग व गरजवंत व्यक्ती यांना मदत करून नवनवीन उपक्रम राबविले जातात गेली अनेक वर्ष तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा तसेच प्राथमिक शाळा यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके ,दप्तरे, कंपास पेट्या तसेच अन्य शैक्षणिक साहित्य यांचे वाटप केले आहे तसेच अपंग बांधव यांना व्हीलचेअरचे वाटप करून एक नवा आदर्श या संस्थेने तालुक्यात घातला आहे .

 तालुक्यातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना पाठबळ मिळावं यासाठी दि. शुक्रवार दिनांक १६ रोजी रत्नागिरी तालुक्यातील चांदेरई शाळा नंबर ०१ येथे तसेच दिनांक १७ जानेवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल पुनस येथे व रविवार दि.१८ जानेवारी रोजी वेसुर्ले शाळा, पुनस कोंड शाळा येथे दप्तर ,गणवेश, वह्या आधी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला पुणे येथील उद्योजक शामकुमार कदम तसेच लांजा तालुक्यातील प्रतिष्ठित डॉ. रोहिनील जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माणुसकीची भिंत प्रतिष्ठान,मुंबई संस्थेचे अध्यक्ष दीपक कांबळे यांनी केले आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES