लांजा दि.०१ ( प्रतिनिधी ) राजापूर नगरपरिषदेच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे यांच्या आज राजापूर शहरात काढलेल्या प्रचार रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि या रॅलीला जनतेतून देखील चांगला प्रतिसाद भेटल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. खलिफे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने आज सकाळी ११ वाजता राजापूर शहरात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जवाहर चौक, शिवाजी चौक, राजापूर हायस्कूल मार्गे राजापूर शहर अशी शेकडो कार्यकर्त्यांसह राजापूर शहरातील व्यापारी, दुकानदार तसेच विविध प्रभागातील नागरिक यांची प्रत्यक्ष भेट घेत महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने आज सकाळी ११ वाजता राजापूर शहरात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जवाहर चौक, शिवाजी चौक, राजापूर हायस्कूल मार्गे राजापूर शहर अशी शेकडो कार्यकर्त्यांसह राजापूर शहरातील व्यापारी, दुकानदार तसेच विविध प्रभागातील नागरिक यांची प्रत्यक्ष भेट घेत महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या रॅलीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. हुस्नबानू खलिफे, यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, माजी आमदार गणपत कदम,जिल्हा प्रमुख दत्ता कदम, विधानसभा संपर्क प्रमुख ॲड. चंद्रप्रकाश नकाशे, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्र प्रमुख तात्या सरवणकर, राजापूर तालुका प्रमुख कमलाकर कदम यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद लाभला
ॲड. चंद्रप्रकाश नकाशे, राजापूर विधानसभा संपर्क प्रमुख
भाजप व शिंदे सेनेचे फसवे राजकारण स्थानिक जनतेच्या लक्षात आले असून यावेळी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिक मेहनत घेत असून जनतेतून देखील चांगल प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे राजापूर, लांजा व देवरुख नगरपरिषदेवर शिवसेना महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील आणि या जिल्ह्यातून भाजप व शिंदे सेना हद्दपार होईल.

