लांजा ( प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांजा शहरातील निवडणुक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यकर्त्यांचा उत्साह, जनतेचा पाठिंबा आणि शासनस्तरावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे लांजा नगरपंचायतीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला. मागील काही वर्षांत लांज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा तसेच शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून येणाऱ्या काळात आणखी विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीतील पदाधिकारी, स्थानिक नेते, महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनीही निवडणुकीत पूर्ण ताकदीने झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला.लांज्यातील राजकारण तापत असताना आमदार सामंत यांच्या या विधानामुळे महायुतीचा आत्मविश्वास आणखी वाढलेला दिसत आहे.
लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सामंत म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत लांजा नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. शासनस्तरावर सुरू असलेले विकासकामे, लांजा तालुक्याचा वाढता वेग आणि महायुतीचा जनआधार लक्षात घेतल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महायुतीचे स्थानिक नेते, महिला आघाडी, युवक नेते तसेच विविध घटकांचे मान्यवर उपस्थित होते. आगामी निवडणुकीत घराघरात जाऊन विकासाची कामे पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत असून लांज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

