Tuesday, March 31, 2026

National

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेले अन्नदान हे नक्कीच कौतुकास्पद – नगराध्यक्ष सावली कुरूप

लांजा दि.०६ (प्रतिनिधी) राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न दान श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे अष्टविनायक कन्स्ट्रक्शन लांजा यांच्या वतीने तालुक्यातील जनतेला आज बुधवार दि.७ जानेवारी रोजी मोफत अल्पोपहार ( नास्ता ) याचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप यांनी याप्रसंगी केले.

आमदार किरण सामंत यांचे समर्थक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे उद्योजक रामदास खानविलकर हे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत असतात. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे रामदास खानविलकर यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधित अन्न दान करीत आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला .
   वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लांजा तहसील कार्यालयासमोर मोफत अल्पोपहार ( नास्ता ) याचे वाटप करण्यात आले यावेळी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच शासकीय कामासाठी आलेली सर्वसामान्य जनता व विद्यार्थी यांनी याचा लाभ घेतला या स्तुत्य व आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे तालुक्याभरातून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES