कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पश्चिमेतील चिकनघर मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, केला आणि त्या कृत्याचे चित्रीकरण केले आहे हे कृत्य ८ नराधमांचा घृणास्पद कृत्य केल्या प्रकरणी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमा अन्वये महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना ३० तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .
कल्याणमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणात ८ नराधमांनी वेळोवेळी या मुलीवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका आरोपीने, जो तिचाच नातेवाईक आहे त्याचं नाव राहुल भोईर याला अटक केले आहे पिढीतला बॉयफ्रेंड मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बतावणी इंस्टाग्राम वर करून भुलवले त्यानंतर त्याने अनेक जणांना त्या तरुणीची संपर्क करून हे ठिकाणी अत्याचार करण्यात आले तिची शूटिंग करण्यात आली त्यानंतर अल्पवयीन मुलीने त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठले महात्मा फुले पोलिसांनी आठ जनावर गुन्हे दाखल केल्या असून लैंगिक अत्याचार ,बलात्कार, आणि सामूहिक बलात्कार पॉक्सो अंतर्गत विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे दरम्यान प्रमुख आरोपी राहुल भोईर सह सहा जणांना एक आरोपी फरार झाला आहे. कल्याण न्यायालयात हजर केले असता ३० सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली

