Wednesday, March 11, 2026

National

‘दिवा पोलीस स्टेशन डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत’ म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच – श्री विजय भोईर,आता तरी जागा हो दिवेकरचे प्रणेते

दिवा (सचिन ठिक ) दिवा शहरात इतर सरकारी कार्यालये नाहीतच परंतु कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी,पोलीस कर्माचाऱ्यांची जास्त संख्या व त्यांना पूरेशी जागा मिळावी, तसेच दिवेकर नागरिकांना हक्काचे पोलीस स्टेशन मिळावे या अनेक वर्षाच्या मागणीला मुख्य प्रवाहाच्या बाहेर पोलीस स्टेशन उभारुन प्रशासन नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा  प्रकार करत आहे. दिवा प्रभाग क्र.२८ मध्ये शासकीय जागा उपलब्ध असताना प्रभाग क्रं.२९ ला पोलीस स्टेशनची निर्मिती करुन नागरिकांना पायपीट करण्यास भाग पाडणार असल्याची प्रतिक्रीया आता तरी जागा हो दिवेकरचे प्रणेते श्री विजय भोईर यांनी दिली आहे.

१५ डिसेंबर 2025 रोजी पासून शहरात चर्चा आहे की, नागरिकांची वस्ती सोडून डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस स्टेशन सुरु होणार आहे. यावर श्री विजय भोईर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यातील नागरिकांची सुरक्षा,त्यांच्या जगण्यातील भिती दूर व्हावी आणि दिवा प्रभाग समिती हद्दीत स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे यासाठी जागो दिवेकरचे प्रणेते श्री विजय भोईर गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. सामाजिक भावनेतून त्यांनी गेली ११ वर्षे दिवा बीट पोलिस चौकी‌साठी मोफत जागा उपलब्ध करुन दिली आहे. दिव्यात नागरीकांच्या हक्काचे पोलीस स्टेशन व्हावे यासाठी  २६ ऑगस्ट २०१४ रोजी माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची भेटही घेतली होती.मात्र बदलत्या राजकारणामुळे दिव्यात आजही स्वतंत्र व हक्काचे पोलीस स्टेशन होऊ शकले नाही. दरम्यान दिव्यात असंख्य प्रमाणात वाढत्या लोकसंख्येच्या शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे पोलीस स्टेशन लांब पल्ल्याच्या जागेवर होणार असल्याने दिवा शहरातील नागरिकांच्या गैरसोईबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, पोलीस स्टेशन व्हावे ही दिव्यातील लाखो लोकांची मागणी आहे.यात सामाजिक संस्था आहेत.पोलीस मित्र आहेत.सामान्य नागरिकही आहेत.परंतु काही निवडक लोकांनी कोणताही औपचारिकता,सोय  न पाहता केवळ निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे घाईघाईने इमारतीची पाहणी केली आहे. या पाहणीत पुर्ण राजकीय हेतू असून सदरच्या पोलीस स्टेशनमुळे सामान्य जनतेचे कोणतेही भले होईल असे दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

गुन्हा घडल्यास नागरिकांची दोन किलोमीटर पायपीट

दिवा शहरात प्रचंड मोठी लोकसंख्या आहे.या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी दिव्यातच पोलीस स्टेशन असायला हवे होते.एखादा गुन्हा घडल्यास किंवा पोलीसांची तातडीची मदत हवी असल्यास सामान्य नागरिकांना तेथील पोलीस स्टेनला पोहचायला दोन ते अडीज किलोमीटरचे अंतर कापावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना रिक्षाचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यात पोलीस स्टेशनच्या कामासाठी वारंवार लांब पल्ल्याच्या चकरा माराव्या लागणार आहेत.

ग्लोबल शाळेजवळ ७७ गुंठे जागा उपलब्ध

श्री विजय भोईर यांनी सांगितले की, दिवा शहरात पोलीस स्टेशनसाठी आताच्या बीटसमोरच ग्लोबल शाळेजवळ शासनाची सर्वे नंबर २४४ वर ७७ गुंठ्याची जागा उपलब्ध आहे.याठिकाणी ही जागा प्रशस्त आहे. ही जागा शहराच्या मध्यभागी आहे. आगासन गाव,साबे गाव,दिवा पश्चिम,बेतवडे आदी ठीकाणच्या नागरीकांसाठी सोयीची होती.या  ७७ गुंठे जागेत दिव्याला एक चांगले,आधुनिक व सूसज्ज पोलीस स्टेशन दिवा प्रभागातच मिळाले असते.परंतु राजकीय अनास्थेमुळे ते आता लांबपल्ल्याच्या जागेवर मिळणार आहे.त्यामुळे नागरिकांना आत्ताच्या बीटपेक्षा तेथील पोलीसस्टेशनची जास्त गैरसोय होणार आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES