ठाणे : कल्याण डोंबिवली परिसरात काही दिवसांपर्वी एका परप्रांतीय गुंडाने निष्पाप मराठी तरुणीवर निर्घृण आणि अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना केवळ एका तरुणीवर हल्ला नसून, संपूर्ण मराठी समाजाच्या अस्मितेवरचा आघात आहे.मराठी एकीकरण समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, काल गुरुवारी कल्याण-डोंबिवली पोलीस आयुक्तालयात अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची निवेदन देऊन संबंधित गुन्हेगारावर पुढीलप्रमाणे ठोस कारवाई करण्याची मागणी केली. या गुन्हेगाराची धिंड काढून समाजात इशारा देणारी ठोस कारवाई करावी.पीडित मराठी भगिनीच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी शासनाने घ्यावी.अशा परप्रांतीय गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींना शहरातून हद्दपार करावे.याचप्रमाणे मराठी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पीडित मुलीला रुग्णालयात जाऊन भेट दिली. तिच्या प्रकृतीची विचारपूस केली व तिच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद साधून या घटनेमुळे त्यांच्यावर झालेला मानसिक आघात समजून घेतला. समितीने त्यांना कायदेशीर, वैद्यकीय व सामाजिक आधार देण्याचे आश्वासन दिले असून संबंधित गुन्हेगारास कठोर शिक्षा होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, याची खात्रीही दिली.मराठी समाजावर होणाऱ्या अन्यायाला आता तितक्याच ताकदीने प्रतिकार केला जाईल!जय मराठी! जय महाराष्ट्र! – – मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
परप्रांतीय गुंडाकडून मराठी तरुणीवर अमानुष मारहाण – मराठी एकीकरण समितीचा तीव्र निषेध आणि ठोस कारवाईची मागणी!