Friday, January 23, 2026

National

RAINBOW,HDFC MUTUAL FUND आणि Airtel तर्फे जावडे येथे शालेय दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

लांजा l प्रतिनिधी

हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, रत्नागिरी–लांजा संचलित प्राथमिक आश्रमशाळा जावडे (निवासी शाळा), ता. लांजा, जि. रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. रेम्बो फाउंडेशन, एचडीएफसी म्युच्युअल फंड व एअरटेल यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   हेरीटेज संस्थेच्या अध्यक्षा व माजी पंचायत समिती सभापती अॅड. अपर्णा पवार तसेच संस्थापक संतोष कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून रेम्बो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश चौहान यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नियमितपणे विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे वितरित करण्यात आली.
    विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक सुलभ होऊन त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुलांचे शिक्षण सुलभ करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी रेम्बो फाउंडेशन, एचडीएफसी म्युच्युअल फंड, एअरटेल तसेच हेरीटेज संस्थेचे आभार मानले.

spot_img

International

RELATED ARTICLES