Thursday, March 12, 2026

National

कोकण प्रतिष्ठान दिवातर्फे ११ वा वर्धापन दिन आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात

गोल्डमेडलिस्ट कोकण सुपूत्र सुशांत आगरे यांचा जाहीर सत्कार

ठाणे (प्रतिनिधी) दिवा शहरातील नामांकित संस्था कोकण प्रतिष्ठान दिवा या संघटनेचा 11 वा वर्धापन दिन आणि दिनदर्शिका प्रकाश सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला असून यावेळी कोकणातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा सोहळा दिवा शहरातील शिवम प्लाजा या हाँलमध्ये घेण्यात आला.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने रावारी गावचे कोकणातील सुपूत्र कु.सुशांत सोनु आगरे यांचा सत्कार करण्यात आला.सुशांत आगरे याने छत्तीगढ येथे झालेल्या नॅशनल पाँवरलिप्फटींग चँम्पियन स्पर्धेत 67.50 किलोग्रँम वजनी गटात 225 किलोग्रँम वजन उचलून सुवर्णपदक पटकावले होते.तसेच त्याने स्टाँगमॅन किताब देखील पटकावले होते.त्याची ही अतुलनीय कामगिरी पाहता आज कोकणचा सुपूत्र म्हणून कोकण प्रतिष्ठान दिवा शहरातर्फे मोठा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमातून सुशांत आगरे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

हा कार्यक्रम साजरा करताना कोकण प्रतिष्ठान दिवातर्फे विविध मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वलन आणि थोर महात्मांच्या प्रतिमेला पुष्पहार करण्यात आला.तद्दनंतर कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना आणि स्वागत सल्लागार निलेश पाटणे करीत होते. यावेळी संस्थेच्या वतीने दिवा शहरातील विविध मान्यवरांचे शाल आणि श्रीफल देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचे उपस्थिती लक्षणीय होती.या सोहळ्यानिमित्त रायगड,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी हळदीकूंकू आणि लकी ड्राँ म्हणून 5 पैठणी साड्या ठेवण्यात आल्या होत्या.हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष श्री संतोष पडियार,माजी अध्यक्ष देवा घाडी, सचिव प्रितम शिंदे,खजिनदार रमेश शिंदे,उपाध्यक्षा सौ.संगिता उत्तेकर,कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत राणे,उपसचिव श्री मंगेश भितळे,सल्लागार निलेश पाटणे,श्री लक्मण जाधव,योगेश कुळये,संजय शिंदे, विजय गोवेकर,आदींसह महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

spot_img

International

RELATED ARTICLES