Saturday, November 15, 2025

National

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचेच नाव लागणार,मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन – खासदार बाळ्या मामा यांची माहिती

भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक आश्वासनामुळे ६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळा जवळ होणारे आंदोलन तात्पुरता स्थगित करत असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

  शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक बोलावली होती.या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आजी माजी आमदार,खासदार,मंत्री,व भूमिपुत्र उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांच्याच नावाची शिफारस केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिबा पाटील यांच्याच नावाला सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीवेळी आपल्याला दिली असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली. विमानतळ नामांतराच्या श्रेय वादात मी पडणार नसून, हे सर्व श्रेय स्थानिक भूमिपुत्रांचे असल्याचे खा.बाळ्या मामा यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन हा आंदोलनाच्या विजयाचा फक्त पहिला टप्पा असून ज्या दिवशी खरोखर विमानतळाला दिवा पाटलांचे नाव लागेल तोच दिवस आमच्यासाठी जल्लोषाचा असेल असेही खा बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले असून जर मुख्यमंत्र्यांनी शब्द पळाला नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील खासदार बाळ्या मामा यांनी राज्य सरकारला दिला आहे.

या पत्रकार परिषदेत सीए निलेश पाटील,सुशांत पाटील,डॉ तपन पाटील,प्रा. सागर पाटील,डॉ. गिरीश साळगावकर, सर्वेश तरे, अविनाश सुतार,पुंडलिक वाडेकर, हिरा पाटील यांच्यासह भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते

spot_img

International

RELATED ARTICLES