Thursday, November 13, 2025

National

हेरिटेज प्रयोगभूमी जावडे येथे कृषिभूषण स्व. वसंतराव गंगावणे वाचन कट्ट्याचे उद्घाटन

लांजा ( प्रतिनिधी ) हेरीटेज प्रयोगभूमी जावडे येथे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाचनासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी हेरिटेज कल्चर आर्ट ऍण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे यांच्या संकल्पनेतून कृषिभूषण स्व.वसंतराव गंगावणे वाचन कट्ट्याचे शाळेतील मुलींच्या हस्ते बुधवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
   यावेळी संस्थापक संतोष कांबळे, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

    याठिकाणी वाचकांना तसेच न्यू इंग्लिश स्कूल जावडे व प्राथमिक तसेच माध्यमिक आश्रम शाळा जावडे येथील विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र, मासिके, गोष्टीची पुस्तके, थोर व्यक्तीची आत्मचरित्र तसेच ग्रंथालयातील इतर पुस्तके उपलब्ध असतील ती पुस्तके व मासिके यांचे विद्यार्थी त्यांच्या सोयीप्रमाणे वाचन करतील. या वाचन कट्याचे नियोजन देखील विद्यार्थीच करणार असून या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे ग्रामस्थ व पालक वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES