Wednesday, March 18, 2026

National

सौ.सपनाताई रोशन भगत : जिव्हाळ्याचा संवाद,सस्नेह गाठी भेटी मात्र लोकसेवेचा नवा प्रवास काट्याकूट्यातून

दिवा (सचिन ठिक) दिवा शहरातील ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.28 मध्ये भाजपा महिला मोर्चाच्या दिवा शहर अध्यक्षा तथा ह.भ.प.सौ.सपनाताई रोशन भगत या सध्या संपुर्ण प्रभागात जिव्हाळ्याचा संवाद आणि सस्नेह गाठीभेटी घेत आहेत. मात्र त्यांचा हा नवा लोकसेवेचा प्रवास काट्याकूट्यातून अविकसित भागातून करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.नागरिकांशी संवाद साधताना कोणतीही तमा न बाळगता अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.दिव्यात बदल व्हावा,नागरिकांना त्यांच्या हक्काच्या नागरी सुविधा मिळाव्या याचा चंग बांधून संपुर्ण प्रभाग क्र.28 हा त्यांनी पिंजून काढला आहे.नागरिकांचा प्रतिसादही त्यांना मिळत आहेत.दिवा शहरात रस्त्यांव्यतिरिक्त गेल्या दहा वर्षात विकास झालेला नाही.पिण्याचे पाणी,रेल्वेचा खडतर प्रवास, आरोग्य व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था,मुलभूत सोयीसुविधा मिळाल्या नाहीत या बाबींवर भर देत भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपनाताई रोशन भगत नागरीकांना विकासाचे आश्वासन देत आहे.

दिवा शहर ठाणे महानगरपालिकेत समाविष्ट झाला मात्र ठाणे महानगरपालिकेकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले.मुंब्रादेवी काँलनीचा सर्वात गजबजलेला मुख्यरस्ताही तसाच प्रलंबित आहे.मुंब्रादेवी कालनीतील पाण्याची लाईन,तेथील अपुरा पाणीपुरवठा ड्रेनेजलाईन इतर आरोग्यसेवचे प्रश्नही प्रलंबित आहेत.अश्या मुद्दयांवर त्या नागरिकांशी संवाद साधत आहे.भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यात क्रमांक 1 चा पक्ष आहे.देश आणि राज्यात चालू असलेली विकास कामे पाहता दिवा शहराचा कायापालट करायला वेळ लागणार नाही याचे महत्व पटवून देण्यासाठी सौ.सपनाताई रोशन भगत दिव्याच्या विकासासाठी पायीपायी फिरत आहेत.एखाद्या पुरुष उमेदृवाराला लाजवेल असा त्यांचा काटाकुट्यातून दिनक्रम चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES