ठाणे – डाक विभाग, महाराष्ट्र सर्कलने नवीन डिजिटल स्वरूपात स्थलांतर केले आहे. `द अॅडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी – आयटी 2.0 अॅप्लिकेशन’ हा डाक विभागाचा डिजिटल रूपांतराचा उपक्रम आहे. हा मैसूरमधील सेंटर फॉर एक्सलन्स फॉर पोस्टल टेक्नॉलॉजी यांनी विकसित केला आहे. एपीटी-आयटी 2.0 प्लॅटफॉर्म प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यक्षमता डाक विभागाचे आधुनिकीकरण आणखी सक्षम करेल.
हे अॅप्लिकेशन क्लाउड आधारित संगणन, मशीन लर्निंग, एआय-चालित अंतर्दृष्टी सक्षम करेल. ह्या बदलामुळे डाकघर वितरण सेवा आणि त्याच्या लेखा कामकाजाला गतिमान करेल.या उपक्रमांतर्गत, डाक विभागाकडे युनिफाइड डेटा सेंटर (डीसी) आणि डिझास्टर रिकव्हरी (डीआर) ट्रांझिशन असेल जे आयटी 1.0 पासून आयटी 2.0 मध्ये स्थलांतरात मदत करेल. विभागाकडे आता एक व्यापक डिजिटल दृष्टिकोन असेल – व्यवसाय विकास आणि ग्राहक-केंद्रित सेवांवर लक्ष केंद्रित करून मूल्य प्रदान करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. एपीटी-आयटी 2.0 चे उद्दिष्ट वाढीव स्वयंचलन, स्केलेबिलिटी आणि सेवा विश्वसनीयतेसह संपूर्ण भारतात एकात्मिक, इंटेलिजन्ट डाक सेवा आहे. आयटी 2.0 हे इंडिया पोस्टला तंत्रज्ञान सक्षम, भविष्यासाठी तयार करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे.
22 जुलै 2025 रोजी, ठाणे पोस्टल डिव्हिजनने आता असलेली सीएसआय प्रणाली मधून एपीटी-आयटी 2.0 अप्लिकेशनमध्ये स्थलांतर केले. ठाणे डिव्हिजनल ऑफिस, ठाणे मुख्य डाकघर, ठाणे बिझनेस पोस्ट सेंटर, ठाणे नोडल डिलिव्हरी सेंटर, ठाणे इंटिग्रेटेड डिलिव्हरी सेंटर, ठाणे अधिकार क्षेत्रातील 22 उप कार्यालये आणि 39 शाखा कार्यालयांनी यशस्वीरित्या नवीन प्रणालीत परिवर्तन केले आहे. या प्रसंगी के. नरेंदर बाबू, एसएसपी, ठाणे विभाग यांनी संबोधित केले की, नवी मुंबई प्रदेशांतर्गत असलेल्या ठाणे विभागाला पायलट फेज रोल-आउटसाठी नामनिर्देशित करण्यात आले होते. ह्यासाठी सर्व प्री-रोल ऍक्टिव्हिटी वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात आल्या. एसएसपी ठाणे विभागाने असेही सांगितले की, नवीन प्रगत पोस्टल टेक्नॉलॉजी अनोंदणीकृत टपालासाठी ट्रकिंग सुविधा, सीओडीसाठी डिजिटल क्यूआर पेमेंट, डिलिव्हरी रिमार्क्सचे रिअल-टाइम अपडेशन, डिजिटल स्वाक्षरी कॅप्चर करण्याचा पर्याय, स्थान आधारित वितरण, ओटीपी/आधार आधारित वितरण, तक्रार व्यवस्थापनासाठी सपोर्ट डेस्कसह घरापर्यंत पिकअप व्यवस्था इत्यादीसाठी सक्षम करेल.
ठाणे हेड पोस्ट ऑफिस येथील उद्घाटन समारंभास डाक विभागातील अनेक मान्यवर, ठाणे विभागाचे कर्मचारी आणि ग्राहकांची उपस्थिती लाभली. श्रीमती सुचिता जोशी, पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रीजनल ऑफिस, आणि डॉ. अभिजित इचके, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिस यांनी एपीटी-आयटी 2.0 च्या यशस्वी रोल आउटबद्दल ठाणे विभागाचे अभिनंदन केले. के. नरेंद्र बाबू यांनी असेही सांगितले की, ठाणे विभाग आता कल्याण मुख्य कार्यालय, त्यांच्या अंतर्गत असलेली उप डाकघरे आणि शाखा डाकघरांच्या यशस्वी रोलआउटची तयारी करत आहे. हे रोलआउट 5 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर, ठाणे विभाग, ठाणे कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

