Tuesday, March 31, 2026

National

ठाण्यातून ठाकरे गटाला मोठा धक्का,माजी आमदार सुभाष भोईर उद्या भाजपात प्रवेश करणार

ठाणे (सचिन ठिक ) शिवसेना फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खंबीरपणे साथ देणारे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर उद्या भाजपाच प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.या वृत्तानंतर मात्र ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.याबरोबरच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्या दिल्याचे समजत आहे.

कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तीन वेळा भेटीगाठी झाल्या आहेत. दरम्यान आज ते भाजपात प्रवेश करणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे आणि कल्याण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईर यांनी घेतलेली भेट एक राजकीय डावपेच मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे ते कट्टर विरोधक म्हणून भोईर ओळखले जातात. त्यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि भाजपच्या नेत्यांशी भोईर यांनी जुळवून घेतल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेतील फुटीनंतरही अनेक आजी-माजी आमदार, नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली होती. मात्र, माजी आमदार भोईर यांनी ठाकरे यांची साथ दिली. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून भोईर ओळखले जातात. यातूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.दरम्यान श्री भोईर यांनी भाजपा प्रवेश केल्याने ठाण्यात भाजपाला मोठे बळ मिळेल असे वर्तविले जात आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES