ठाणे (सचिन ठिक ) ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिव्यातून भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरु असतानाच भाजपा इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.मात्र पक्षाचा आदेश हा अंतिम असल्याने तो आम्ही पाळणार असे भाजपा दिवा शीळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर यांनी सांगितले आहे.
दिवा शहरात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात भाजपाचा एकही नगरसेवक नाही.त्यामुळे येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी जोरदार तयारी दर्शविली होती.भारतात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे दिव्यातही भाजपाचे कमल फुलेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता.मात्र मित्रपक्ष असलेल्या शिंदेगटालाचा पुन्हा प्राधान्य दिल्याने याठिकाणी भाजपा पदाधिकारी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.या ठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर होण्याची जनता वाट पाहत असतानाच प्रभाग क्रं.28 आणि 27 मध्ये एकही उमेदवार न दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कमजोर झाला आहे.
मात्र राज्यात महायुतीची सत्ता आहे.महायुतीचा धर्म वरिष्ठांनी जपला असल्याचे सांगून भाजपा दिवा शिळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर यांनी पक्षाचाच अंतिम आदेश पाळला जाईल असे स्पष्ट केले.दरम्यान दिवा भाजपाची जोरदार तयारी असताना पक्षाने कार्यशील एकही उमेदवार न दिल्याने पुढे त्याचा का परिणाम होतो हे पहावे लागणार आहे.

