ठाणे – ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 81 येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेघा घाडगे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना बाऊस्कर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली, विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनपट विषयी भाषणे सादर केली.
यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ.कविता मगरे आणि शिक्षक कर्मचारी श्री. पोपट धादवड यांनी महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांची माहिती मुलांना करून दिली. सौ.मनीषा संसारे मॅडम यांनी आंबेडकरांविषयी कविता सादर केली.बुद्ध प्रार्थना व भीम स्तुती यांच्या परिचय विद्यार्थांना शिक्षकांनी करुन दिला.यावेळी शाळेचे परिचर श्री तुषार परब व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

