Friday, January 23, 2026

National

ठामपा प्रभाग क्र.29अ मधून कु.वेदिका सुनिल आलिमकर गॅस सिलेंडर निशाणीवर लढणार

ठाणे (मंगल खारपाटील) – ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा प्रभाग समितीमधून सर्वात कमी वयाची असलेली कु.वेदिका सुनिल आलिमकर ही घरगुती गँस सिलेंडर या निशाणीवर लढणार असून आजपासून प्रभाग क्र.29अ मधून जोरदार प्रचाराला सुरवात करणार आहे.

कु.वेदिका आलिमकर यांचे वड़ील श्री सुनिल आलिमकर हे पुर्वीपासूनच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.आपल्या गावातील विविध विकास कामांसाठी त्यांचा वैयक्तिक सहभाग असतो.ते आपल्या क्षेत्रात स्वताचा वैयक्तिक निधी खर्च करण्यास करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत.असे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सुनिल आलिमकर यांना ओळखले जाते.

त्यांच्या या कार्यास प्रशासनाचे बळ मिळावे म्हणून ठाणे महानगरपालिका प्रभाग.क्र.29 अ मधून आपली कन्या कु.वेदिका आलिमकर यांना निवडणुकीत उतरविले आहे.वेदिका आलिमकर ही उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांनी फायनान्स मधून एमबीए केलेला आहे.त्यामुळे एखादा निधी कुठे आणि कसा खर्च करावी याची जाणीव तिला आहे.

कु.वेदिका आलिमकर ही ठामपा प्रभाग क्र.29अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवित आहे.तिला घरगुती गँस सिलेंडर हे चिन्ह मिळाले असून आजपासून घराघरात प्रचार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES