Tuesday, March 31, 2026

National

गवाणे जिल्हा परिषद गटात चेतन दळवी यांना जनतेतून वाढता पाठिंबा

लांजा दि.२५( प्रतिनिधी )तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील युवा उमेदवार चेतन दळवी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गवाणे जिल्हा परिषद गटात वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिल्याने त्यांच्या संपर्क दौऱ्याला निष्ठावंत शिवसैनिक व जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
     पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या आदेशाने गवाणे जिल्हा परिषद गटातून युवा नेतृत्व म्हणून चेतन दळवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे चेतन दळवी हे गवाणे जिल्हा परिषद गटामध्ये दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तिमत्व असून त्यांना युवा वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे उमेदवारी अधिकृत जाहीर होताच त्यांनी प्रचाराचा मोठा गाजावाजा न करता मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे व व त्यांना मतदारांतून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे .
    चेतन दळवी यांच्या विजयासाठी लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, उपतालुकाप्रमुख संजय नवाथे, विभागप्रमुख लक्ष्मण मौर्य यांनी या विभागात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या गाठीभेटीवर जोर दिला असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. चेतन दळवी यांच्या उमेदवारीमुळे शिंदे गटात हलचल माजली असून युवा वर्गासाठी नेहमीच कार्यरत असणारे चेतन दळवी यांच्या विजयासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत आता युवा वर्ग देखील प्रचारात उतरलेला दिसून येत असून त्यांनी कडवे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES