Wednesday, February 11, 2026

National

ठाणे मनपाच्या प्रभाग क्र.२८ मधून श्री जयदीप भोईर इच्छुक

ठाणे ( प्रतिनिधी ) ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्याच तर मी वार्ड क्रमांक २८ मधून पुरुष गटातून इच्छुक असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे दिवा व्यापारी सेलचे अध्यक्ष श्री जयदीप भोईर यांनी शहर न्यूजशी बोलून दाखविले आहे.ते म्हणाले की वार्ड क्रमांक २८ मधून मला जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे. मात्र भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी मला संधी दिल्यास मी नक्कीच या संधीचे सोने करीन असे श्री जयदिप भोईर यांनी सांगितले आहे.

गेली अनेक वर्षे श्री जयदीप भोईर हे भाजपा दिवा व्यापारी सेलचे अध्यक्ष आहेत.ते बेतवडे येथील स्थानिक रहिवाशी असून त्यांचे या विभागात लहानपण गेले आहे.दिवा शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.मात्र या वाढलेल्या लोकसंख्येला आवश्यक सुविधा अजूनही मिळत नसल्याची खंत त्यांना वाटत आहे.ते म्हणाले की,आपल्याला मुंब्रादेवी कालनी,बेडेकर नगर दातिवली,म्हातार्डी,आगासन,बेतवडे,गणेशपाडा बेडेकर नगर याठिकाणी मोठ्याप्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे.या लोकसंख्येप्रमाणे येथील लोकांना अजूनही आवश्यक असा पाणीपुरवठा मिळत नाही.तेथील युवा वर्गाला आजही खेळाचे हक्काचे मैदान उपलब्ध झालेले नाही.कोणताही शासकीय आवश्यक अशी सुविधाही नाही.शासकीय दवाखाने,पोलीस स्टेशन,तसेच बेतवड्यातील नादुरुस्त व्यायामशाळा अशी अनेक समस्या या दिवा शहरात सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

श्री जयदिप भोईर हे तरुण इच्छुक उमेदवार आहेत.युवा वर्गाशी त्यांची नाळ जोडलेली आहे.त्यांचा दांडगा संपर्कही आहे.त्यांनी सांगितले की,आपल्या गावासाठीही काहीतरी करुन दाखवायचे आहे.गावात अनेक पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत.मात्र त्यात पाणी नाही.आगासन फाटकातील उड्डाण पुल,चांगले रस्ते,भुमीपुत्रांच्या जमिनींना न्याय मिळवून देणे आदी अनेक कामांबाबत  त्यांनी चर्चा केली.

दरम्यान आपण भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक असून आपले वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मान्यतेनुसारच पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

spot_img

International

RELATED ARTICLES