ठाणे – देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या लोकाभिमुख कामांना प्रेरित होऊन माजी आमदार सुभाषजी भोईर यांच्यासह युवासेनेचे दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
यांच्यासह उपशहर अधिकारी सुयोग राणे, शाखाप्रमुख प्रतिक म्हात्रे, शहर सचिव उमेश राठोड, सोशल मीडिया समन्वयक विराज सुर्वे, विभाग अधिकारी आकाश शुक्ला, अक्षय भोईर, शाखा अधिकारी प्रथमेश गुरव, अमित पाटील, सूरज नाचरे, नयन ओझा, धीरज पाटील व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी भक्कम होईल असे मानले जात आहे.दिवा शहर आणि इतर भागात भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आहेत,मात्र एक परिपुर्ण नेता या भागात मिळणे भारतीय जनता पार्टीला गरज बनली होती.आता सुभाष भोईर यांच्या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणचे राजकारण बदलण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घेतलेला निर्णय भाजपाला ठाणे मनपात आपले अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे.


