Tuesday, March 31, 2026

National

रस्ता, साकव व गटार म्हणजे विकास नव्हे,गवाणे जिल्हा परिषद गटात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करणार – चेतन दळवी

लांजा दि.२८ (प्रतिनिधी) रस्ता, साकव व पाखाडी बांधली म्हणजे विकास झाला असे नाही तर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही मला फक्त एक संधी द्या त्या संधीच सोने करीत विकास काय असतो ते तुम्ही बघू शकता असे भावनिक आवाहन गवाणे जिल्हा परिषद गटाचे उच्च शिक्षित उमेदवार चेतन दळवी यांनी खानवली पंचायत समिती गणात प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मतदार यांच्या गाठीभेटी प्रसंगी केले.

उन्हाळ्यात बांधलेला रस्ता, पाखडी, साकव येणाऱ्या पावसाळ्यात लगेच वाहून जातो आणि सर्वसामान्य जनता फक्त पाहत बसते ही इथली अवस्था आहे. भ्रष्टाचाराने इथली राजकीय व्यवस्था पोखरली असून त्याच्या दबावापोटी प्रशासन देखील पाठीशी घालत आहे म्हणून या भागात अत्यंत निकृष्ट कामे झाली आहेत त्यामुळेच लांजा तालुका विकासापासून वंचित राहिला आहे त्याला पूर्णतः जबाबदार भाजप व शिंदे सेनेचे पदाधिकारी जबाबदार आहेत. मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी माझ्यासारख्या एका युवकाला एक संधी दिली असून तुमचा मतदान रुपी आशीर्वाद दिलात तर गावणे जिल्हा परिषद गटात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करताना सर्व सोयी सुविधा असलेले रुग्णालय सुरू करणार असून मोफत रुग्णवाहिका, उत्तम दर्जाचे रस्ते, २४ तास वीज, पाणी आदी सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून भविष्यात सापूचेतळे येथे इंजिनियर कॉलेज व इंग्रजी माध्यमाची शाळा देखील सुरू करण्याचा मानस असल्याचे चेतन दळवी यांनी आपल्या विकासाचा वेगळा आराखडा मांडत असल्याने त्यांना गावाने जिल्हा परिषद गटात जोरदार पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. त्यांच्या सोबत तालुका प्रमुख सुरेश करंबळे, उपतालुका प्रमुख संजय नवाथे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. स्वरुपा साळवी, माजी सभापती सुभाष रामाणे आदी प्रमुख पदाधिकारी यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या गाठीभेटीवर जोर देताना दिसून येत आहे त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उच्च शिक्षित उमेदवार चेतन दळवी यांना गवाणे जिल्हा परिषद गटातून वाढता पाठिंबा मिळताना दिसून येत असून त्यांनी भाजप महायुती समोर कडवे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES