Thursday, February 12, 2026

National

लांजा कुवे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीने प्रचारात मारली मुसंडी

लांजा ( प्रतिनिधी ) लांजा कुवे नगरपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असून प्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहे दरम्यान या प्रचारात शिवसेना (उद्धव ठाकरे) महाविकास आघाडीने सर्वच प्रभागात जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी विजयाची खात्री व्यक्त करीत आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले दिसून येत असून शिंदे सेनेसह भाजपचे उमेदवार चिंतेत आलेले दिसून येत आहे.
शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेताना दिसून येत आहे तसेच सर्वच कार्यकर्ते वाडी वस्तीवर फिरताना दिसून येत असून त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडी चे पारडे जड झालेले दिसून येत आहे त्यामुळे विरोधक हतबल झाल्याचे चित्र लांजा शहरात दिसत आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस,शिवसेनेचे लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश राणे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांच्या नियोजनानुसार लांजा शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली दिसून येत आहे तसेच या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट तसेच भाजप यांनी जनतेची कशाप्रकारे फसवणूक सुरू केलेले आहे तसेच लांजा शहरातील डीपी प्लॅन असेल डंपिंग ग्राउंड चा विषय असेल यासह लांजा शहरातील स्ट्रीट लाईट, नळ पाणी योजना तसेच बंदिस्त गटार या मूलभूत सोयीसुविधा देण्यास गेल्या दहा वर्षात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या उमेदवारांना घरी बसविण्याची विनंती सर्वच पदाधिकारी करताना दिसून येत आहे .
तसेच नगरपंचायतीच्या सर्वच प्रभागात शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार व प्रमुख पदाधिकारी हे वाडी वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे त्यामुळे लांजा कुवे नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाजी मारतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES