Wednesday, February 11, 2026

National

लांजा नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवून आमदार किरण सामंत पुन्हा एकदा ठरले किंग मेकर

शिवसेना महायुतीच्या सौ. सावली सुनील कुरूप यांचा नगराध्यक्ष पदी प्रचंड मताधिक्याने विजय.

लांजा दि .२१ प्रतिनिधी संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत किंग मेकर किरण सामंत यांनी एकहाती सत्ता आपल्या ताब्यात ठेवून पुन्हा एकदा किंग मेकर ठरले असून त्यांचे लांजा शहरासह तालुक्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे. लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ प्रभाग व नगराध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सावली सुनील उर्फ राजू कुरूप या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत सावली कुरूप यांनी तब्बल २००० हजारच्या फरकाने आपले प्रतिस्पर्धी सौ. पूर्वा मुळे व प्रियांका संजय यादव यांचा पराभव केला आहे तर १७ प्रभागातील नगरसेवक पदाच्या झालेल्या निवडणुकीत तब्बल दहा जागांवर महायुतीने एकहाती सत्ता काबीज केली आहे तर कुवे येथील दोन जागावर गाव विकास पॅनल तर आगरवाडी मतदारसंघांमध्ये एक जागा ही अपक्ष असली तरी ती महायुती सोबत असल्याचे बोलले जात आहे तसेच तीन अपक्ष हे जरी स्वतंत्र निवडून आले असले तरी देखील ते महायुती सोबतच राहण्याची शक्यता लांजा शहरातून व्यक्त केली जात आहे तर उर्वरित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकमेव नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे देखील लांजावाशी यांचे लक्ष लागले आहे

यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत सावली कुरूप यांना एकूण ४ हजार ६७४ मते मिळवुन विजय खेचून आणला तर महाविकास आघाडीच्या पूर्वा मुळये यांना २ हजार ६९० मतांवर तर प्रियांका संजय यादव यांना २६४० मतांवर रोखण्यात शिवसेना-भाजप महायुतीला यश आले. सौ. सावली कुरूप यांनी नगराध्यक्ष पदाचा बहुमान पटकावताच शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची अतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
लांजा नगरपंचायत प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-
प्रभाग क्र.०१ निधी निलेश गुरव (शिवसेना शिंदे) प्रभाग क्र.०२ पंढरीनाथ बाळकृष्ण मायसेटे (शिवसेना) प्रभाग क्र. ०३ श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना) प्रभाग क्र.०४ सुशीला गणपत कांबळे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग क्र.०५ सिद्धेश जयराम भुवड (अपक्ष) प्रभाग क्र.०६ योगेश गोपीनाथ कावतकर (शिवसेना) प्रभाग क्र. ०७ प्रांजळ प्रथमेश यादव (शिवसेना) प्रभाग क्र. ०८ मिलिंद मनोहर लांजेकर (अपक्ष )प्रभाग क्र.०९ रफिक कुदबुद्दीन नेवरेकर (अपक्ष )प्रभाग क्र. १० प्रणाली गुरुप्रसाद तेली (भाजप) प्रभाग क्र.११ नीलिमा अशोक कनावजे (शिवसेना) प्रभाग क्र.१२ वंदना रामचंद्र काडगाळकर (अपक्ष) प्रभाग क्र. १३ साक्षी किशोर मानकर (शिवसेना) प्रभाग क्र.१४ वैभव यशवंत जोईल
(शिवसेना) प्रभाग क्र.१५ मनोहर धनाजी बाईंग (शिवसेना) प्रभाग क्र. १६ अनिल धोंडू गुरव अपक्ष आणि प्रभाग क्र.१७ नेहा मदन राडये (अपक्ष) या उमेदवारांनी विजय मिळविला आहे .
राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी आपल्या निवडक सहकारी यांना सोबत घेत या निवडणुकीत लक्ष घातले होते. कधी कुठे आणि कसे फासे टाकायचे आणि विजयश्री कशी खेचून आणायची याची चांगली माहिती असणाऱ्या किरण सामंत यांनी शेवटच्या टप्प्यात आपली रणनीती आखली आणि सावली कुरूप यांचा विजय सुकर झाला असे लांजा शहरात बोलले जात आहे. शिवसेना( शिंदे गट) भाजप,राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते जरी सोबत असले तरी खरे किंग मेकर किरण सामंत च ठरले असल्याचे बोलले जात असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष सावली सुनील कुरूप व सर्व विजयी नगरसेवक यांचे लांजा शहरासह तालुक्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES